दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात
आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात. 
 व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका.
आहे तो परिणाम स्विकारा. 
 प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा
आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा. 
 प्रयत्न करत राहा कारण
अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत. 
 प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते. 
 तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून
गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता. 
 चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकलात जरी,
तरी एखादा तारा नक्कीच मिळेल. 
 बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य
आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य! 
 अंधारच नसता तर चमकणाऱ्या
ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती. 
 अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो. 
 जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे,
तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे. 
 आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं
हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं. 
 सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं
त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायच असतं. 
 अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. 
 अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा. 
 अविजय हाच आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो. 
 अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका. 
 असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात.
तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते,
त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो
आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही भीती नसते. 
 उत्साह हेच सर्वकाही आहे
फक्त ते गिटारच्या तारांप्रमाणे नीट आवळलेले असायला हवे. 
 अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे. 
 "मी 'कोणापेक्षा' चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही,
पण मी 'कोणाचे' तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल …!" 
 उठा ! जागृत व्हा !!
जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका. 
 स्वतःचा विकास करा.
ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत. 
 आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत
ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी. 
 आतला आवाज सतत ऐकत राहणे,
हीच स्वातंत्र्य मिळविण्याची किंमत आहे. 
 आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे. 
 आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. 
 आपण ज्या ध्येयासाठी मेहनत घेत आहोत.
त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच आवश्यक आहे. 
 आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु. 
 आपली बाजू योग्य असेल
तर दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात. 
 आपले लक्ष्य, साध्य विसरू नका.
अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. 
 आपले सत्य-स्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते
व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागतात. 
 आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं. 
 विचार करण्यासाठी वेळ द्या,
कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे. 

 जिवनात कितीही कठीण प्रंसग आले
तरी तक्रार करु नका, कारण 'परमेश्वर' हा असा दिग्दर्शक आहे
जो कठीण 'भूमिका' नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो.....!