आधुनिक भारताचा इतिहास -1857 चे स्वातंत्र्य युद्ध व त्याची कारणे

1857 चे स्वातंत्र्य युद्ध -

 

भारतात व्यापारासाठी आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने येथील राज्यकर्त्यांच्या भांडणात परस्पर विरोधकांना मदत करून आपला स्वार्थ साधला. लॉर्ड वेलस्ली त्याने तैनाती फौजेचा वापर करून हैदराबादचा निजाम अयोध्येचा नवाब, होळकर, पेशवे या सर्वांना मांडलिक बनवून आपला भूप्रदेश वाढविला.  लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून झांशी सातारा संबलपूर जैतपुर ही संस्थाने खालसा केली. 1849 मध्ये पंजाब ताब्यात घेऊन  इंग्रज भारतातील सार्वभौम सत्ताधीश बनले. 

 

       लॉर्ड कॅनिंग गव्हर्नर जनरल असताना आर्थिक सामाजिक धार्मिक व राजकीय परिस्थितीमुळे जनतेत असंतोष निर्माण झाला. शेवटी शिपायांमधील बंडाची परिणती व्यापक लढ्यात झाली हजारो शेतकरी, कारागीर आणि शिपाई या युद्धात सामील झाले होते. ब्रिटिशांच्या सतराशे 57 ते अठराशे सत्तावन च्या शंभर वर्षांच्या काळात देशाची आर्थिक पिळवणूक फार मोठ्या प्रमाणात होऊन परंपरागत आर्थिक परिस्थितीवर त्याचा विपरीत परिणाम झालेला होता. शेतकरी व जमीनदार हे पूर्णता नागवले गेले होते ग्रामीण कारागिरांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम झाला होता. नवीन महसुली कायद्यामुळे बऱ्याच जमीनदारांना आपल्या जमिनीलाच मुकावे लागले होते. शेतकरी सावकारांच्या कर्जात पूर्णपणे बुडालेले होते नोकरशाहीतील कनिष्ठ स्तरांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जास्त असल्याने लोकांच्या कामाची अडवणूक होत होती. न्यायदानाच्या क्लिष्ट पद्धतीमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांना न्याय मिळत नव्हता.

 

1857 च्या बंडातील महत्वाची ठिकाणे व तेथील नेतृत्व -

 

उठावाचे केंद्र

 भारतीय नेतृत्व

संबंधित इंग्रज 

अधिकारी

दिल्ली

 बहादुरशहा जफर, सेनापती बक्त खान

 निकोलसन,  हडसन

कानपूर

नानासाहेब पेशवे, सेनापती: तात्या टोपे, सल्लागार : अझीमुल्लाखान

हॅवलॉक व कॅम्पबेल

 झाशी

बेगम हजरत महल

 कॅम्पबेल

लखनऊ

राणी लक्ष्मीबाई

ह्युरोझ

जगदीशपूर

राजा कुवरसिंह, अमरसिंह

विल्यम    टेलर

फैजाबाद

मौलवी अहमद उल्ला

     ---

बरेली

खान बहादुर खान

     ---

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सप्टेंबर 1857 मध्ये इंग्रजांनी दिल्ली परत घेतली 20जून 1858 रोजी इंग्रजांनी झांशी उठाव वाल्याकडून जिंकली 18 एप्रिल 1859 रोजी तात्या टोपे यांना फाशी झाल्यानंतर उठावाचा बीमोड झाला. व ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपूर्ण ब्रिटिश संसदेचे राज्य भारतावर सुरू झाले. 

 

1857 च्या बंडाची सर्वात जास्त प्रभावाची क्षेत्रे- 

 

कानपुर, काल्पी, कोटा, ग्वाल्हेर, गोरखपुर, जालंदर,अयोध्या,अलिगड, अजमगड, फैजाबाद,अलाहाबाद,आग्रा,इटावा, इंदूर, जगदीशपूर, बरेली, बदाउन,बांदा, मैनपुरी, मथुरा, मोहम्मदी महू, मुजफ्फरनगर, रांची, लुधियाना, ललितपुर, लखनऊ, शहाजानपुर, सागर, सियालकोट सेहरानपुर, सीतापुर, सुलतानपूर, हाथरस, जलपैगुरी, जबलपुर, झाशी, झेलम, दिल्ली, दरियाबाद फिरोजपुर, फत्तेगड, बुलंद शहर

1857 च्या  बंडाची कमी प्रभावाची क्षेत्रे-

 

मुंबई, मद्रास, राजपीपला, सातारा, सोलापूर, डाका, धारवाड, हैदराबाद, औरंगाबाद, अहमदाबाद, नरखेड, जालंधर, नागपूर, कोल्हापूर, पेशावर, बेळगाव भरतपूर.

 

 

1857 च्या  उठावाबद्दलची मते-



अठराशे सत्तावनच्या उठावास  कोणतेही पूर्वनियोजन  नव्हते असे मानणाऱ्या लेखकात आर.सी मुजुमदार,  एस. एन.सेन व न.र.फाटक यांचा समावेश आहे. 

न. र. फाटक  यांनी अठराशे सत्तावन च्या उठावाचे वर्णन शिपायांची बाहूगर्दी अशा शब्दात केले आहे . 

तर फ्रान्समध्ये हिंदी उठावाचे God's judgement upon English rule in India असे वर्णन केले आहे.

 

the great rebellion” या पुस्तकात अशोक मेहता म्हणतात अठराशे सत्तावनचे बंड हे शिपायांच्या बंडाहुन अधिक होते. अनेक ऱ्हासास  जाणाऱ्या शक्तींना वाट मोकळी करून देणार्‍या सामाजिक ज्वालामुखीचा तो स्फोट  होता.

 

वि. दा. सावरकर-  अठराशे सत्तावन चा क्रांतीची प्रधान कारणे असलेली दिव्य तत्वे म्हणजे स्वधर्म व स्वराज्य ही होत. हा उठाव म्हणजे हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले क्रांतीयुद्ध.

 

सर जॉन लॉरेन्स-  बंडाचे  खरे मूळ लष्करात होते त्याचे मूळ कारण म्हणजे  काडतूस प्रकरण होय.



डॉक्टर ईश्वरी प्रसाद-  कंपनीची  राजवट नष्ट करणे, व परकीयापासुन स्वातंत्र्य मिळवण्याचे उद्दिष्ट असलेले उत्तरेकडील बँड